शिरूरमध्ये ३२ वर्षीय महिलेवर ८ नराधमांकडून बलात्कार, ७ महिन्यांनी घटना उघडकीस

पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आठ नराधमांनी एका ३२ वर्षीय विधवा महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी पीडित महिलेला विविध ठिकाणी घेऊन जात तिला नरक यातना दिल्या आहेत. तब्बल सात महिन्यांनी हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल  करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक केली आहे

माऊली पवार, रज्जाक पठाण, काळु वाळुंज, विठ्ठल काळे, राजेश उर्फ पप्पु गायकवाड, आकाश गायकवाड, संदीप वाळुंज, नवनाथ वाळुंज अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली आहे.

PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.41.00
PicsArt_21-12-24_13-44-33-203
Picsart_22-03-30_13-11-35-784
previous arrow
next arrow

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बत्तीस वर्षीय विधवा महीला पीडित महिला ही विधवा असून ती गावात एकटीच राहते. महिलेच्या एकटेपणाचा आणि भोळ्या स्वभावाचा या आरोपींनी गैरफायदा घेतल्याचं कळतंय. सर्व आरोपी हे एकाच गावातले असून महिलेच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेऊन तिला जिवे मारायची धमकी देत आरोपी तिच्यावर बलात्कार करायचे. त्यामुळे प्रत्येकवेळी जिवाच्या भीतीमुळे महिला घाबरुन आरोपींसोबत जायची. गेल्या सहा महिन्यांपासून आरोपींनी पीडित महिलेवर कधी घरामध्ये,उसाच्या शेतात, शाळेच्या पाठीमागे, नदीकिनारी नेऊन तिच्यावर अत्याचार केला.या त्रास सहन न झाल्याने पिडीत महिलेने पोलिसात धाव घेतली. त्यानुसार शिरूर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिरूर चे पोलिस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक चरापले मॅडम करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.