गुटख्याची अवैध पद्धतीने वाहतूक करणाऱ्या आरोपीला अटक ; ८१ लाखाचा मुद्देमाल जप्त
पुणे : गुटख्याची अवैध पद्धतीने वाहतूक करणाऱ्या एकाला गुन्हे शाखा युनिट सहाच्या पोलिसांनी अटक केली आहे.ही कारवाई पुणे-सोलापूर महामार्गावर थेऊरफाटा येथे करण्यात आली. अटक आरोपीकडून तब्बल ५६ लाख रुपयांचा ४ हजार किलो विमल गुटखा जप्त केला आहे
प्रविण दुर्योधन जाधव (वय २६ वर्षे,रा.मु.पो. गुरसाळे,
ता.खटाव,जि.सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे युनिट ६ मधील पथक गस्तीवर असताना माहिती मिळाली की, पुणे सोलापूर महामार्गावर एक ट्रकमधून प्रतिबंधित असलेला गुटखा वाहतूक केली जात आहे यावर पोलीस निरीक्षक गणेश माने यांना याविषयी माहिती दिली त्यावर सापळा रचून कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार पथकाने थेऊरफाटा येथे सापळा रचून आयशर ट्रक क्र एम एच ११ सी एच ६०६८ ताब्यात घेऊन चालक प्रवीण दुर्योधन जाधव रा गुरसाळे ता खटाव जि सातारा यास ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता त्यात प्रतिबंधित असलेला गुटखा असल्याचे सांगितले त्यानुसार अन्न व औषध प्रशासन चे अधिकारी कोकणे यांना कारवाई साठी बोलून त्यांच्यासमक्ष आयशर ट्रकची तपासणी केली असता त्यात १५०
त्यामध्ये ५६ लाख ४८ हजार ८२० रुकाय किंमतीचा ४००० किलो विमल गुटखा व वाहतूकीकरिता वापरलेला २४ लाख ५० हजार रुपये किंमतीचा आयशर ट्रक असा एकूण ८० लाख ९८ हजार ८२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा माल बाजारामध्ये दुप्पट किंमतीने विकला जात असल्याचे निदर्शसनास आले असून बाजारभावाने जप्त गुटखा मालाची किंमत करोडोमध्ये जात आहे. लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!