मोस्ट वॉंटेड जाफर इराणीला पुणे पोलिसांकडून जेरबंद
पुणे- हरियाणा आणि दिल्ली राज्यात दाखल असलेल्या तब्बल 22 गुन्ह्यांत वॉंटेड असलेल्या जाफर इराणीस शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. हरियाणा पोलिसांनी 45 लाखाचे सोने चोरल्याप्रकरणी त्याला अटक केली होती. तेथे पोलिसांना संमोहित करुन पळून गेल्यानंतर सात पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले होते. यामुळे हरियाणा पोलिसही त्याच्यामागावर होते. जाफर अली खान इराणी ( 30, ईराणी, वस्ती शिवाजीनगर) असे अटक आरोपीचे नाव आहे.
शिवाजीनगर पोलीस रविवारी ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना इराणी वस्ती विष्णूकृपानगर शिवाजीनगर येथे एक व्यक्ती त्यांना बघुन पळून जाऊ लागला होता. त्याला पाठलाग करुन त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने जाफर इराणी असे नाव सांगितले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याला नुकतेच कोंढवा पोलिसांनी अटक केले होते. या गुन्हयात तो जामिनावर बाहेर आलेला असल्याचे समजले. तसेच तो श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात पाहिजे असले बाबत माहिती प्राप्त झाली. तसेच हरियाणा व दिल्ली येथे मोस्ट वॉन्टेड असून तो एकूण 22 गुन्ह्यांमध्ये पाहिजे असल्याबाबत माहिती मिळाली. त्यापैकी हिसार पोलीस स्टेशन हरियाणामध्ये दाखल गुन्हयात 1 त्याने किलो सोने 45 लाख रुपये कस्टम आधिकारी असल्याची बतावणी करून चोरी केली आहे. हिसार पोलीस स्टेशन यांनी दाखल गुन्ह्यात आरोपी जाफर अलि खान इराणी यास अटक केले होते, तेव्हा तो त्यांचे अटकेतून पळून गेला होता . त्यावरून हिसार पोलीस स्टेशन चे 7 पोलीस निलंबित केले गेले होते. सदरच्या गुन्ह्यात हरियाणा राज्याचे पोलीस महासंचालक कॉर्डीनेट करत आहेत. सध्या आरोपीस श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई उपायुक्त प्रियांका नारनवरे , सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावंकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे ,विक्रम गौड पोलीस निरीक्षक (गुन्हे) ,सहायक पोलीस निरीक्षक उत्तम माने ,पोलिस उप निरिक्षक भैरवनाथ शेळके, पोलिस उपनिरिक्षक विनोद महागडे ,पोलीस उप निरीक्षक विजय पानकर पो.हवा.बशीर सय्यद पोलीस,पोलीस नाईक इनामदार, अंमलदार राहुल होळकर, पोलीस अंमलदार अनिकेत भिंगारे ,पोलीस अंमलदार माने ,पोलीस अंमलदार कोल्हे, पोलीस अंमलदार पुंडे यांनी केली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!