एकतर्फी प्रेमातुन 29 वर्षीय तरुणाचा खून, एका महिलेसह सात जणांना अटक ; पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट ५ ची कामगिरी
पिंपरी चिंचवड : चांदखेड गावाच्या हद्दीत चंदनवाडी येथे एकतर्फी प्रेमातुन झालेल्या अनोळखी व्यक्तीच्या खून झाला होता. या खुनाचा कोणतेही धागेदोरा नसताना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट ५ ने लावला छडा लावत एका महिलेसह सात जणांना अटक केली आहे.
रोहीणी अमोल ओव्हाळ, संतोष उर्फ अप्पा पोपट पिंजन (वय 36 वर्षे रा. भांबोली पिंजन कॉम्प्लेक्स ता. खेड जि. पुणे), कृष्णा भैरव जाधव (वय ३६ सांमुर्डी विठ्ठल मंदिराजवळ ता. खेड जि. पुणे), संपत वैजनाथ लांडगे (वय ३६. रा. ब-हाडे ता. खेड जि.
पुणे मुळ रा. विठ्ठल वाडी ता. जि. उस्मानाबाद), विष्णू रघु कोंडे (वय 36 रा. नानोली ता. मावळ जि. पुणे), प्रदीप शांताराम तुळवे ( वय 30. रा. करंजविहरे ता. खेड जि. पुणे), नारायण अंबादास आहेर (वय 22 रा. भांबोली राऊत यांचे भाड्याचे खेलीत ता. खेड जि. पुणे मुळ रा. रेंदाळे ता. येवला जि. नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. तर सचिन नाथा पवार (वय 29 वर्ष रा.देवाची ऊरळी गणेश नगर पिराचा मंदिरा शेजारी ता.हवेली जि.पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदखेड गावाच्या हद्दीत चंदनवाडी येथील अग्रवाल यांचे मालकीचे बंद पडलेल्या बांधकाम खोली मध्ये 19 जानेवारी रोजी एक वय 25ते 30 वर्षे असलेल्या व्यक्तीचे प्रेत रक्ताचे थारोळ्यात अंगावर फक्त अंडरवियर असलेले अर्धनग्न असस्थेत पोलिसाना सापडले. सदर व्यक्तीचा अज्ञात
कारणासाठी अज्ञात व्यक्तींनी डोक्यामध्ये काहीतरी जड हत्याराने मारुन खुन केला असल्याने शिरगाव पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला होतो. सदर गुन्हयाचा समांतर तपास वरिष्ठांचे आदेशान्वये गुन्हे शाखा युनिट ५ कडील पथक करीत होते.
सदर अनोळखी मयत वयती कोण आहे याबाबत गुन्हे शाखा, युनिट ५ वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले व पोलीस अमलदार यांनी घटनास्थळाची पाहणी करून आजूबाजूच्या भागातील सीसीटीव्हीची पाहणी करण्यात आली. तसेच स्थानिक लोकांकडून माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत असताना पुणे शहर, पुणे ग्रामीण तसेच पिंपरी चिंचवड हद्दीतील सर्व मिसिंग चेक करण्याचे काम हाती घेतले असता लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे सदर मयत व्यक्तीच्या वर्णनाप्रमाणे व्यक्ती मिसिंग असल्याची तक्रार लोणी काळभोर पोलिस ठाण्यात असल्याची माहिती मिळाली. या मिसिंग बाबत खात्री करून मिसिंग मधील व्यक्ती आणि मयत व्यक्ती हे एकच असल्याची खात्री झाल्याने मयत व्यक्ती हा सचिन नाथा पवार असल्याची खात्री पोलिसांना झाली.
तसेच पुढील तपास करत असत पोलिसाना माहीती मिळाली की, सचिन पवार यांचे रोहिणी अमोल आव्हाळे या महिलेशी एक तर्फी प्रेम होते. त्यामुळे आम्हाला रोहीणी व तीचे पती अमोल आव्हाळे यांचा संशय आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवुन गुन्हे शाखा युनिट ५ येथे आणुन अधिक चौकशी केली असता रोहीणी हिने सचिन पवार यास तिचे दाजी संतोष पोपट पिंजण व मानलेला भाउ नामे कष्णा जाधव व त्यांचे इतर साथीदार यांचे मार्फत मारहाण करुन खुन केला असल्याची कबुली दिली. त्यानंतर दाजी नामे संतोष पिंजन यास ताब्यात घेतल्या नंतर त्याचेकडे अधिक सखोल चौकशी केली असता त्याने सदरचा खुन हा त्याचे साथीदार कृष्णा भैरव जाधव, संपत वैजनाथ लांडगे,विष्णू रघु कोंडे, प्रदीप शांताराम तुळवे, नारायण अंबादास आहेर यांचे साथीने केला असल्याची कबुली दिली . त्यानंतर पोलिसांनी सर्व साथीदारांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
यातील मयत इसम सचिन पवार यास यातील आरोपी नामे रोहीणी अमोल ओव्हाळ हिने 18 जानेवारी रोजी एमची गॅस चौ म्हाळुगे येथे बोलावुन घेवुन तिचा दाजी संतोष उर्फ अप्पा पोपट पिंजन व सर्व साथीदाराच्या मदतीने शेवरलेट क्रुझ गाडी (क्रमांक एमएच ०४ इक्यु ३१२१) मध्ये घालुन व दुसरी आल्टो कंपणीची (गाडी नंबर एम एच १४ जी एच ३६५१) यामध्ये बसुन करंजविहारे गावचे हदीत जंगलाचे बाजुला नेवुन लाथाबुक्याने तसेच लाकडी दांडक्याने जबर मारहाण करुन जखमी करुन पुन्हा शेवरलेट क्रुझ गाडी मध्ये बसुन त्याचे तोंडाला चिकटपटी लावुन गाडीमध्ये
मारहाण केली. काही वेळाने सचिन पवार हा बेशुध्द झाल्याने व त्याची हालचाल बंद झाल्याने त्यास शेवरलेट क्रुझ गाडीमधुन संतोष पिंजन, नारायण आहेर व प्रदीप शांताराम तुळवे यांनी चांदखेड खिंडीमध्ये जंगल्याचे बाजुस असलेल्या पडक्या इमारती जवळ नेहुन पुन्हा लोखंडी रॉडने डोक्यावर मारुन रुममध्ये टाकुन दिले आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश , अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे ,पोलीस उपआयुक्त गुन्हे काकासाहेब डोळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ २ आनंद भोईटे,
सहायक पोलीस आयुक्त प्रशांत अमतकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, सपोफौ धनरात किरनाळे, पोहवा दत्तात्रय बनसुडे, नितीन बहीरट, पोना संदिप ठाकरे, अली शेख, पोलीस शिपाई भरत माने, राजकुमार इघारे, दयानंद खेडकर, तांत्रीक शाखा पोहवा नागेश माळी, शिरगाव पोलीस चौकी मपोना
अश्विीनी कांबळे,विदया ओगले यांचे पथकाने केली आहे
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!