पुणे : चंदन तस्करी प्रकरणात एकास पकडले ; गुन्हे शाखा युनिट एकची कामगिरी

पुणे :  चंदनाच्या लाकडांची तस्करी करणाऱ्यास  गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून चंदनाच्या झाडांचे ओंडके, दुचाकी असा एकूण दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पुण्यातील भवानी पेठेतील टिंबर मार्केट मध्ये सोमवारी (दि.24) करण्यात आली आहे. निलेश बाळू डोळस  (वय-30 रा. निगडी ओटा स्किम, मिलिंदनगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

निलेश डोळस हा चंदनाचे ओंडके विक्री करण्यासाठी भवानी पेठेतील टिंबर मार्केट येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी टिंबर मार्केट परिसरात सापळा रचला. डोळस दुचाकीवरुन आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या पोत्याची झडती घेतली असता त्यामध्ये 4 चंदनाचे ओंडके आढळून आले. जप्त केलेल्या चंदनाच्या ओंडक्यांची किंमत एक लाख रुपये आहे. याप्रकरणी वनपरिमंडळ अधिकारी लोणी काळभोर मंगेश सपकाळ  Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी विरोधात भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41,42,43 तसेच महाराष्ट्र वन नियमावली 2014 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे , सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश संखे , पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी , पोलीस अंमलदार अमोल पवार, अजय थोरात, अय्याज दड्डीकर, तुषार माळवदकर, महेश बामगुडे, इम्रान शेख, मीना पिंजण यांच्या पथकाने केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.