फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत महिलेचा विनयभंग, तरुणाला अटक

पिंपरी चिंचवड : मैत्री करून शारीरिक संबंध ठेव, अन्यथा फोटो सोशल मीडियावर टाकीन, अशी धमकी देऊन एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली.याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्याच्या म्हाळुंगे पोलीस चौकीत एका तरुणावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. हा प्रकार रविवारी (दि.२३) दुपारी चारच्या सुमारास म्हाळुंगे येथील भाजी मार्केटजवळ  घडला.

नूर पीर मोहम्मद (वय २३, रा. वरळे रोड, म्हाळंगे, मूळ राहणार लोटाढ , ता मेजारोड, जिल्हा इलाहाबाद, उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे. प्रकरणी एका २७ वर्षे महिलेने फिर्याद दिली आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने फिर्यादीच्या घरी जाऊन माझ्याशी मैत्री कर आणि शारीरिक संबंध ठेव, नाहीतर तुझे फोटो सोशल मीडियावर टाकून तुझी बदनामी करेन अशी धमकी दिली. तसेच महिलेचा हात पकडून मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.पीडित तरुणीने म्हाळुंगे पोलीस चौकीत आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी 354,354(अ) नुसार गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक थेऊरकर करीत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.