बिबवेवाडी परिसरात दहशत पसरविणा-या अट्टल गुन्हेगारावर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई

पुणे : बिबवेवाडी पोलीस ठाणे परिसरात दहशत पसरविणा-या अट्टल गुन्हेगारावर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मागील १ वर्षामध्ये ५४ गुन्हेगारांना एमपीडीए कायदयान्वये स्थानबध्द केले आहे.

सौरभ शरद शिंदे (वय-२० वर्षे,रा.बी ३५/१२,अप्पर इंदिरानगर बिबवेवाडी,पुणे) असे स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

सौरभ शिंदे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याचे साथीदारांसह सिंहगड रोड पोलीस ठाणे, पुणे हद्दीमध्ये कोयता या सारख्या जीवघेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्रासह इच्छापूर्वक गंभीर दुखापत करणे, दुखापत करणे, दरोड्याचा प्रयत्न, दंगा, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत.

मागील ०५ वर्षामध्ये त्याचेविरूध्द ०६ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.

प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन श्री.अमिताभ गुप्ता,पोलीस आयुक्त,पुणे शहर यांनी नमूद इसमाचे विरुध्द एमपीडीए कायदयान्वये नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे ०१ वर्षा करीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दहशत निर्माण करणा-या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक.प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यानुसार मागील १ वर्षामध्ये ५४ गुन्हेगारांना एमपीडीए कायदयान्वये स्थानबध्द केले आहे. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी
प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.