मोबाईल आणण्यास नकार दिल्यामुळे भाच्याच्या पोटामध्ये खुपसला चाकू ; पुण्यातील धक्कादायक घटना

 पुणे : मित्राकडे राहिलेला मोबाईल आणण्यास नकार दिल्यामुळे चिडलेल्या मामाने स्वतःच्या १७ वर्षीय भाच्याच्या पोटामध्ये चाकू खुपसून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना मार्केट यार्ड येथे २४ जानेवारी रोजी घडली. या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी मामाला अटक केली असून जखमी मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.41.00
PicsArt_21-12-24_13-44-33-203
Picsart_22-03-30_13-11-35-784
previous arrow
next arrow
पीयूष दीपक शर्मा (वय १७) असे जखमी मुलाचे नाव आहे. तर संजय गोकुळ परदेशी (वय ३८) असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मीना गोकुळ परदेशी (वय ६५) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय परदेशी याला दारू पिण्याचे व्यसन आहे. तो वेल्डिंगची मिळेल तशी कामे करतो. त्याची आई मीना परदेशी या मिळेल ते काम करून कुटुंब चालवितात. जखमी पियुष हा आरोपी संजय परदेशी यांच्या बहिणीचा मुलगा आहे. पियुष एक वर्षाचा असताना त्याच्या आईचे निधन झाले. तेव्हापासून तो मामाच्या घरी राहतो.

घटनेच्या दिवशी आरोपी संजय हा रात्री दारू पिऊन आला. त्याचा मोबाईल मित्राकडे विसरलेला होता. त्यांनी आई मीना यांना हा मोबाईल घेऊन येण्यास सांगितले. मात्र आईने मी आत्ताच कामावरून आले असुन थकले असल्याचे सांगत मोबाईल आणण्यास नकार दिला. दरम्यान त्यावरून घरामध्ये वादावादी सुरू झाली. पियुष याला आरोपीने मोबाईल घेऊन येण्यास सांगितले. परंतु आरोपी आजीसोबत भांडत असल्याने त्याने सुद्धा मोबाईल आणून देण्यास नकार दिला. चिडलेल्या आरोपीने या दोघांना घराबाहेर काढून दाराची कडी लावून घेतली.

या दोघांनी ते दार उघडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने दार उघडून त्याच्या हातातील चाकु पियुष याच्या पोटात खुपसला.
पियुष या घटनेत गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७, ५०४ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) अन्वये १३५ अन्वये गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.