खुनाच्या गुन्हयात सहा महिन्यापासुन पोलिसांना गुंगारा देणा-या आरोपीस अटक
पुणे : खुनाच्या गुन्हयात सहा महिन्यापासुन पोलिसांना गुंगारा देणा-या आरोपीस खंडणी विरोधी पथक-१ ने लातूर मधून अटक केली आहे. चैतन्य प्रभाकर सुरवसे (वय-२४ वर्षे,रा.स.नं.१३३,दांडेकर पुल,पेट्रोल पंपा समोर,पुणे ; मुळगाव-बोरी उमरगा,जि.लातुर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून करून फरार झालेला आरोपी चैतन्य सुरवसे हा त्याच्या मुळगाव लातुर या ठिकाणी असल्याची माहिती खंडणी विरोधी पथक-१ ला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी लातूर येथे जाऊन सापळा रचुन आरोपी चैतन्य सुरवसे यांस शिताफीने ताब्यात घेतले. त्याला पुढील कारवाईसाठी दत्तवाडी पोलीस ठाणे येथे देण्यात आले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह-आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त
रामनाथ पोकळे , पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे, सहा.पोलीस आयुक्त गजानन टोम्पे, खंडणीविरोधी पथक १ चे स.पो.नि.संदीप बुवा, पो.उप.निरी. विकास जाधव, पोलीस
अंमलदार रविंद्र फुलपगारे , मधुकर तुपसौंदर, दुर्योधन गुरव यांनी केलेली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!