छेडछाडीची तक्रार पोलिसांत केल्याच्या रागातून अल्पवयीन मुलीच्या डोक्यात हातोडीने घाव घालत प्राणघातक हल्ला
पिंपरी चिंचवड : पोलीस ठाण्यात छेडछाडीची तक्रार केल्याच्या रागातून एका तरुणाने अल्पवयीन मुलीच्या डोक्यात हातोडीने घाव घालत तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात मुलगी जखमी झाली आहे. ही घटना गुरुवारी (दि. २७) सायंकाळी साडेसहा ते सात वाजताच्या कालावधीत बाजार गल्ली रोड, तळेगाव दाभाडे येथे घडली. याप्रकरणी आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे.
शिवम विनोद शेळके (वय २०, रा. यशवंतनगर, तळेगाव दाभाडे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी जखमी १७ वर्षीय मुलीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी १७ वर्षीय मुलीने आरोपी शिवम शेळके याच्या विरोधात छेडछाडीची तक्रार तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या रागातून शेळके याने हातोड्याने फिर्यादीच्या डोक्यात अनेक घाव घालून प्राणघातक हल्ला केला. यामध्ये फिर्यादी मुलगी गंभीर जखमी झाली आहे.पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर झोल तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!