भाई न म्हणल्याने कुत्र्यासारखे बिस्कीट खायला लावून तरुणाला बेदम मारहाण ;पिंपरीतील धक्कादायक प्रकार!

पिंपरी चिंचवड : भाई न म्हणाल्याच्या कारणावरून सराईत गुन्हेगारासह त्याच्या चार साथीदारांनी तरूणाला कमरेचा बेल्ट आणि लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. जमिनीवर बिस्किटे टाकुन ती खाण्यास भाग पाडली. हा खळबळजनक प्रकार थेरगावातील गणेशनगर येथे घडला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने हा संतापजनक प्रकार समोर आला.

प्रथमेश दवडे (वय २०) असं जखमी तरुणाचे नाव असून त्याने याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहन वाघमारे या सराईतासह प्रशांत आठवडे (रा. शिवकॉलनी, गणेशनगर, थेरगाव), आदित्य काटे (रा. ताथवडे), प्रेम शिंदे (रा. लोकमान्य कॉलनी, गणेशनगर, थेरगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

आरोपी रोहन हा सराईत गुन्हेगार असून त्याला यापूर्वी तडीपार करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच त्याची तडीपारी संपल्याने तो हद्दीत आला होता. आरोपी रोहन याने फिर्यादी तरूणाला मोबाईलवर कॉल करून शिवीगाळ केली आणि भेटण्यास बोलविले. त्यानुसार, तरूण मंगळवारी (दि. २५) रात्री साडेदहाच्या सुमारास गेला. तरूणाने रोहनला तू मला फोनवर शिवीगाळ का केली, अशी विचारणा केली. याचा राग आल्याने तू मला रोहन का म्हणालास, मला भाई का नाही म्हणाला, मी या एरियाचा भाई आहे, असे म्हणत रोहनने तरूणाला शिवीगाळ केली. तसेच कमरेच्या बेल्टने मारहाण करत जमीनीवर टाकलेली बिस्किटे खाण्यास भाग पाडले. इतर आरोपींनीही तरूणाला शिवीगाळ करत बेल्टने व लाथाबुक्क्यानी बेदम मारहाण केली. यामध्ये तो जखमी झाला. हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यात आला होता. या गुंडांच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर प्रथमेशने पोलीस स्टेशनकडे धाव घेतली.

या प्रकरणी आरोपी गंग्या उर्फ रोहन वाघमारे, प्रशांत आठवडे, आदित्य काटे आणि प्रेम शिंदे या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.