भोसरीत दगडाने ठेचून तरुणाचा खून
पिंपरी चिंचवड : दगडाने ठेचून तरुणाचा खून केल्याची घटना भोसरी येथील सम्राट हॉटेलच्या मागील बाजूला आज (शुक्रवारी, दि. 28) सकाळी उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धावडेवस्ती भोसरी येथील सम्राट हॉटेलच्या मागील बाजूला एका तरुणाचा मृतदेह आज सकाळी आढळला.अज्ञातांनी तरुणाला दगडाने मारून त्याचा खून केला आहे. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मयत तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!