माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीने घेतला गळफास, मृत्यूचं गूढ कायम

बंगळुरू – कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नातीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सौंदर्या असे तीचे नाव असून ती बी. एस. येडियुरप्पा यांची पहिली मुलगी पद्मा यांची कन्या होती. तिच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली आहे. कौटुंबिक कलहामुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. बेंगळुरूतील एका खासगी अपार्टमेंटमध्ये लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.41.00
PicsArt_21-12-24_13-44-33-203
Picsart_22-03-30_13-11-35-784
previous arrow
next arrow

पोलिसांनी तपासाची चक्र गतीने फिरवायला सुरुवात केली आहे. अद्याप मृत्यूचं कारण अस्पष्ट असल्याने संपूर्ण प्रकरणाचं गूढ कायम आहे. त्यामुळे ही आत्महत्या असल्याची अद्याप कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती आपल्या पती आणि 6 महिन्यांच्या मुलासोबत माउंट कार्मेल कॉलेजजवळील एका उच्चभ्रू अपार्टमेंटमध्ये राहत होती. तीन वर्षांपूर्वी तिचे लग्न झालं होतं. आज सकाळी राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला. तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बाऊरींग रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे

सौंदर्या हिने नेमकी आत्महत्या कोणत्या कारणाने केली याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. सौंदर्याचा मृतदेह आता शवविच्छेदनासाठी सरकारी बाऊरींग रुग्णालयात हलवण्यात आला आहे. या बातमीने येडियुरप्पा यांचे कुटुंबीय आणि राज्य भाजपाला धक्का बसला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी येडियुरप्पांचे सांत्वन करण्यासाठी रुग्णालयात धाव घेतल्याची माहिती आहे.

बीएस येडीयुरप्पांनी कर्नाटकचे 19 वे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला होता. शिकारीपुरा या मतदारसंघातून ते कर्नाटक विधानसभेचे सदस्य म्हणून काम पाहतात. कर्नाटकात आतापर्यंत चार वेळा मुख्यमंत्री आणि तीन वेळा कर्नाटक विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हे कार्य करणारे ते एकमेव राजकारणी आहेत. ते शिमोगा जिल्ह्यातील शिकारीपुरा मतदारसंघातून आमदार आहेत. या मतदारसंघातून ते आठ वेळा निवडून आले आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.