मोठी बातमी ! पुण्यातल्या शाळा, कॉलेज १ फेब्रुवारीपासून सुरु होणार – अजित पवार
पुणे :गेल्या काहीदिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यासोबत ओमायक्रॉनचा धोकाही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर राज्यातील काही शाळा 19 जानेवारीपान सुरू करण्यात आल्या. मात्र पुण्यातील करोना परिस्थिती नियंत्रणात आली नसल्याने शाळा सुरू.करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता.
दरम्यान, आता लवकरच पुण्यातील शाळा पुन्हा.एकदा सुरु होणार आहेत. येत्या मंगळवार पासून.म्हणजेच 1 फेब्रुवारीपासून पुण्यात शाळा सुरू होणार असल्याची माहिती पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली.
पुण्यात पहिली ते ८ वी पर्यंत चार तासच शाळा भरवली जाईल. नववीच्या पुढे पूर्ण वेळ शाळा सुरु होईल. पण सर्व नियम पाळूनच शाळा सुरु होतील. मुलांना शाळेत पाठवायचं की नाही याचा निर्णय पालकांनी घ्यायचा आहे. मुंबईत रुग्णसंख्या कमी झाली आहे. पुण्यातही दोन दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होत आहे, असेही ते म्हणाले. त्यांनी आज शनिवारी पुण्यात कोरोना आढावा बैठकीनंतर ही माहिती दिली.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्कमुक्त महाराष्ट्राबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. मास्क वापरणं बंधनकारक आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी आज शनिवारी पुण्यात कोरोना आढावा बैठकीनंतर ही माहिती दिली.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्राला मास्कमुक्त करण्यावर चर्चा झाली असल्याची माहिती पुढे आली होती. यावर अजित पवार यांनी खुलासा केला आहे
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अजित पवार यांनी भाष्य केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली आहे. यामुळे एसटी आता पूर्वपदावर यायला पाहिजे, असे त्यांनी आवाहन केले आहे.
१२ आमदारांबाबत कायदेतज्ज्ञांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
‘वाईन आणि दारुमधला फरक ओळखा’
मॉल, सुपर मार्केट आणि किराणा स्टोअर्समध्येही वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. अर्थात, वाईन विक्रीसाठी किराणा स्टोअर किंवा सुपर मार्केटचा आकार एक हजार चौरस फुटांपेक्षा जास्त असण्याची अट घालण्यात आली आहे. पण राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयावर भाजपने मात्र जोरदार टीकास्त्र सोडले होते. सरकार पेट्रोल, डिझेल स्वस्त करण्याऐवजी दारूला सवलती देत असल्याचे भाजपने म्हटले होते. यावर अजित पवार यांनी टीकाकारांना उत्तर दिले आहे. वाईन आणि दारुमधला फरक ओळखला पाहिजे, असे भाष्य त्यांनी केले आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!