शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून महाविद्यालयीन तरूणीची आत्महत्या ; कोल्हापुरातील खळबळजनक घटना

कोल्हापूर :  शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून महाविद्यालयीन तरूणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षकाने लग्न करण्याचा तगादा लावल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून 6 दिवसांपूर्वी विष प्राशन केले होते. उपचार सुरु असताना तिचा शुक्रवारी मृत्यू झाला आहे. ही घटना कागल तालुक्यातील अर्जुनवाडा येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे.

आकांक्षा तानाजी सातवेकर (वय 19) असं मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी मुरगूड पोलिसांनी आरोपी अमित भीमराव कुंभार या शिक्षकाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अमित कुंभार हा कागल तालुक्यातील मुगळी येथील एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तो आकांक्षा हिला फोन करून तर कधी सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत त्रास देत होता. मागील महिना दीड महिन्यापासून तो वेगवेगळे संदेश ही पाठवायचा. लग्नासाठी होकार दिला तर मी माझी बायको मुलांना सोडून तुझ्या सोबत विवाह करण्यास तयार होईन, असं म्हणत मेसेज पाठवत होता.

PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.41.00
PicsArt_21-12-24_13-44-33-203
Picsart_22-03-30_13-11-35-784
previous arrow
next arrow

या सर्व प्रकारामुळे 22 जानेवारी रोजी आकांक्षाने कंटाळून आपल्या राहत्या घरीच विष प्राशन केले. तिला उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. यादरम्यान, 27 जानेवारी रोजी आकांक्षाने, “मी अमित कुंभार यांच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन केल्याचा जबाब वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्या समोर दिला होता.” मात्र, उपचार सुरू असतानाच काल दुपारी तिचा मृत्यू झाला आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.