अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत महिलेचा विनयभंग

पिंपरी चिंचवड : उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने एका व्यक्तीने महिलेचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी (दि. 28) रात्री सात ते आठ आणि शनिवारी (दि. 29) दुपारी दोन वाजताच्या दरम्यान घडली.

प्रकाश तुळशीराम शर्मा (रा. राजस्थान) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.41.00
PicsArt_21-12-24_13-44-33-203
Picsart_22-03-30_13-11-35-784
previous arrow
next arrow

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेला पैसे दिले होते. ते पैसे परत न केल्याने आरोपीकडे फिर्यादी यांचे पूर्वीचे असलेले अर्धनग्न फोटो त्यांच्या ओळखीच्या लोकांच्या व्हाट्सअपवर पाठवले. त्यानंतर फिर्यादी यांना अश्लील मेसेज करून अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्या मानस लज्जा निर्माण केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी जाधव तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.