आय.टी. पार्क मध्ये काम करणा-या तरुणांकडून चोरीच्या ५ अॅक्टीव्हा मोपेड गाडया जप्त

पुणे : आय.टी. पार्क मध्ये काम करणा-या तरुणांकडून गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी पथक १ ने ५ अॅक्टीव्हा मोपेड गाडया जप्त करत त्याला अटक केली आहे.

यश अनंत येनपुरे (वय- १९ वर्षे, रा. श्रमिक कॉलनी, लेन नं १४, कर्वेनगर, पुणे), गणेश ज्ञानदेव धनवटे (वय- १९ वर्षे, रा. घर नं. ५, थोरात निवास, गल्ली नं ६, कॅनॉल रोड, कर्वेनगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे गुन्हे शाखा दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ चे पोलिस कोथरुड पोलीस स्टेशन व वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे हद्दीत वाहनचोरीचे अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे हद्दीत कर्वेनगर चौक येथे थांबले असता त्यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एका ग्रे रंगाच्या अॅक्टीव्हा गाडीवरुन दोन व्यक्ती हे महर्षी कर्वे कॉलेज कडुन कर्वेनगर चौकाकडे येणाया रोडने फिरत असुन सदर व्यक्तीकडे असलेल्या अॅक्टीव्हा गाडीच्या पुढील बाजुस नंबर प्लेट नसुन सदर मोपेड गाडीचे पाठीमागे एम.एच. १२ आर क्यु ८९८२ असा नंबर असलेली नंबर प्लेट दिसत असुन सदर मोपेड गाडीचा नंबर बदलेला आहे व सदरची मोटार सायकल ही चोरीची आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर बातमीची खातरजमा करुन वरील पोलिसांना दोघांना अॅक्टीव्हा मोटार सायकलसह ताब्यात घेतले.  त्यांची दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर येथील कार्यालयात आणुन  चौकशी असता त्यांनी सदरची मोटार सायकल ही कोथरुड परिसरातुन चोरल्याचे सांगितले.

त्याच्याकडे अधिक चोकशी केली असता त्यांनी आणखी मोटार सायकली चोरी केल्याचे सांगितले.  त्याच्याकडे कोथरुड पोलीस स्टेशन, डेक्कन पोलीस स्टेशन, वारजे माळवाडी पोलीस स्टेशन,
हिंजवडी पोलीस स्टेशन येथील गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहे.

त्यांच्याकडुन पोलिसांनी १ लाख ४५ हजार रुपये किमतीच्या
५ अॅक्टीव्हा मोपेड गाडया जप्त करण्यात आल्या आहेत.
सदर आरोपीस पुढील कारवाईकरीता डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

सदरची कारवाई पुणे शहरचे अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) मा. श्रीनिवास घाडगे, सहा.पोलीस आयुक्त मा. गजानन टोम्पे, गुन्हे शाखा १, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखालील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१, गुन्हे शाखा, चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे,.सपोफौ शाहिद शेख, पोलीस हवालदार निलेश शिवतरे, पोलीस नाईक धनंजय ताजणे, मॅगी जाधव, गणेश पाटोळे, गणेश ढगे, पोलीस अंमलदार श्रीकांत दगडे, ऋषिकेश कोळप, सुमित ताकपेरे व नारायण बनकर, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.