इंस्टाग्रामवरील स्वयंघोषित ‘थेरगाव क्वीन’ च्या विरोधात गुन्हा दाखल ; अश्लील भाषेत शिवीगाळ करत देत होती धमकी
पिंपरी चिंचवड : इंस्टाग्रामवर अश्लील भाषा वापरत व्हिडीओ पोस्ट करणा-या थेरगावच्या स्वयंघोषित ‘थेरगाव क्वीन’ सह तिघांच्या विरोधात वाकडं पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साक्षी हेमंत श्रीश्रीमल (रा. थेरगाव), कुणाल कांबळे (रा. गणेशपेठ), साक्षी राकेश कश्यप (रा. चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीना स्वतःच्या मोबा. फोनवरती काही इंन्स्ट्राग्राम व्हिडीओ प्राप्त झाले, ते त्यांनी पाहिले असता त्यामध्ये इन्स्ट्राग्राम अकाऊंट Thergaon- QueenN या नावाचे अकाउंट चालवणारी मुलगी साक्षी श्रीश्रीमल हिने तिच्या सोबत असणारा मुलगा कुणाल आणि एक मुलगी साक्षी कश्यप यांच्यासोबत मिळून सार्वजनिक ठिकाणी अश्लील भाषा व शब्द वापरले आणि धमकीवजा व्हिडीओ बनवले,जे इंस्टाग्रामवर पोस्ट केले. यामुळे समाजातील मुलामुलींची नीतिभ्रष्ट होण्यास व मानसिक स्थिती बिघडविण्यास आरोपींची ही कृती कारणीभूत असल्यास आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपींच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 292,294, 506, 34, माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 67 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहा.पोलीस निरीक्षक संभाजी जाधव करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!