इंस्टाग्रामवरील स्वयंघोषित थेरगाव क्वीनला वाकडं पोलिसांकडून अटक

पिंपरी चिंचवड : समाजातील मुलामुलींची नितीभ्रष्ट होण्यास व मानसिक स्थीती बिघडविण्यास कारणीभुत ठरणाऱ्या इंस्टाग्रामवरील स्वयंघोषित थेरगाव क्वीनला वाकडं पोलिसांनी अटक केली आहे.

साक्षी हेमंत श्रीश्रीमाळ (वय १८ वर्षे १ महीना ( रा. मातोश्री बिल्डींग, तीसरा मजला, पवार नगर – ३, थेरगाव पुणे, साक्षी राकेश कश्यप (वय १८ वर्षे रा. पत्राशेड, लिंकरोड, जलशुध्दीकरण
जवळ, पत्राचाळ, पिंपरी पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीना स्वतःच्या मोबा. फोनवरती काही इंन्स्ट्राग्राम व्हिडीओ प्राप्त झाले, ते त्यांनी पाहिले असता त्यामध्ये इन्स्ट्राग्राम अकाऊंट Thergaon- QueenN या नावाचे अकाउंट चालवणारी मुलगी साक्षी श्रीश्रीमल हिने तिच्या सोबत असणारा मुलगा कुणाल आणि एक मुलगी साक्षी कश्यप यांच्यासोबत मिळून सार्वजनिक ठिकाणी अश्लील भाषा व शब्द वापरले आणि धमकीवजा व्हिडीओ बनवले,जे इंस्टाग्रामवर पोस्ट केले. यामुळे समाजातील मुलामुलींची नीतिभ्रष्ट होण्यास व मानसिक स्थिती बिघडविण्यास आरोपींची ही कृती कारणीभूत असल्यास आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपींच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 292,294, 506, 34, माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 67 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गार्भीय ओळखुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.विवेक मुगळीकर व पोलीस निरीक्षक (गुन्हे- ०२) रामचंद्र घाडगे यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागाचे अधिकारी सपोनि. अभिजीत जाधव यांना गुन्हयातील आरोपीस तात्काळ अटक करणे बाबत आदेशीत केले. सपोनि.अभिजीत जाधव, पोलीस अंमलदार पोना अतिक शेख, मपोहवा मपोहवा पोवार व इतर अंमलदार यांनी शिताफिने आरोपीस साक्षी हेमंत श्रीश्रीमाळ व साक्षी राकेश कश्यप यांना तात्रीक तपास करून त्यांनी गुन्हयात वारपलेले डीव्हाइस सोबत ताब्यात घेतले.

त्याच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने विचारणा केली असता त्यांनी गुन्हयाचे गांभीर्य माहीत नसल्याने गुन्हा केल्याचे कबुल केले. सदर बाबत त्यांनी पच्छाताप व्यक्त करून माफी मागीतली आहे. सदर बाबत पोलीस निरीक्षक, गुन्हे-०२, श्री रामचंद्र घाडगे हे अधिक तपास करीत असून आरोपी साक्षी हेमंत श्रीश्रीमाळ व साक्षी राकेश कश्यप यांना अटक करण्यात आली आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.