भोसरीतील तरुणाच्या खून प्रकरणातील ४ आरोपींना अटक, पिंपरी चिंचवड दरोडा विरोधी पथकाची कामगिरी
पिंपरी चिंचवड : भोसरी मधील धावडेवस्ती येथे एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून दगडाने ठेचून खून केल्याचा प्रकार 27 जानेवारी रोजी उघडकीस आला.या खुनाच्या गुन्ह्याचा पिंपरी चिंचवड दरोडा विरोधी पथकाने छडा लावला असून ४ आरोपी अटक केली आहे. आरोपींनी तरुणाचा खून केल्यानंतर ४० फूट त्याला फरफटत नेऊन गॅरेजमध्ये फेकल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
नामदेव शिवाजी शिंदे (वय २४, धावडे वस्ती, भोसरी. मूळ रा.याकतपुर, ता.औसा, जि. लातूर), भारत उर्फ बारक्या भीमराव आडे (वय २२, रा.धावडे वस्ती, भोसरी),आकाश अशोक सरदार (वय २४, रा. नाणेकरवाडी, चाकण), लक्ष्मण राजू नागोले (रा. धावडे वस्ती, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.गणेश शिवाजी गडकर (रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी. मूळ रा. टाका, पो. औसा, ता. जि. लातूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ जानेवारी रोजी धावडे वस्ती भोसरी येथे एका तरुणाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली. त्या गुन्ह्याचा समांतर तपास दरोडा विरोधी पथकाने सुरु केला. घटनास्थळ
आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी पोलिसांनी सुरु केली. त्यात काही मुले घटनास्थळी दारू पिलेली आढळून आली. सदगुरुनगर येथे एका सराईत गुन्हेगाराची झडती घेत असताना नामदेव शिंदे हा उशिरापर्यंत झोपलेल्या स्थितीत आढळला. त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या तीन साथीदारांसोबत मिळून गणेश गडकर याचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या तीन साथीदारांना देखील अटक केली आहे.
यातील मृत व्यक्ती व आरोपी नामदेव शिंदे हे एकाच जिल्यातील राहणारे असुन, त्यांच्यामध्ये आपसात वाद होता. त्याचा काटा काढण्याचे उद्देशाने नामदेव शिंदे याने त्याचे तीन साथीदारांसह कट रचला. नामदेव शिंदे याने मयत गणेश गडकर यास २७ जानेवारी रोजी रात्री ११ वाजयच्या सुमारांस फोन करून जनता गॅरेज येथे बोलावुन घेतले होते.
त्या ठिकाणी त्यांची पुन्हा वादावाद झाली, त्या वादामध्ये नामदेव शिंदे याचे पॅन्टचे बटन तुटुन पॅन्ट खाली सरकल्याने, त्यास राग अनावर झाल्याने, त्याने त्याचे वरील तीन साथीदारांसह मिळुन गणेश गडकर यास जमीनीवर खाली पाडुन त्याचे डोक्यात दगड मारून, डोके ठेचुन, त्यास पुरावा नष्ट करण्याचे हेतुने, त्यास चाळीस फुट फरपटत नेवुन गॅरेज मधील दोन गाडयांच्यामध्ये फेकुण दिले व आरोपी तेथुन फरार झाले होते.
सदर कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. काकासाहेब डोळे,सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) पद्माकर
घनवट, दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनिरी मंगेश भांगे, तसेच पोलीस अंमलदार महेश खांडे, उमेश पुलगम, राजेंद्र शिंदे, विक्रांत गायकवाड, राहुल खारगे, नितीन लोखंडे, आशिष बनकर, गणेश हिंगे, सागर शेडगे, गणेश कोकणे, समीर रासकर, विनोद
वीर, गणेश सावंत, सुमीत देवकर, अमर कदम, प्रविण माने, नागेश प्रभाकर माळी ,प्रविण कांबळे, राजेंद्र शिंदे , चिंतामण सुपे, औंदुबर रोंगे यांचे पथकाने केली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!