मोठी बातमी : दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविरोधात भडकवल्याप्रकरणी अखेर हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटकला अटक
मुंबई : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षेविरोधात भडकवल्याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटकला पोलिसांनी अटक केले आहे. हिंदुस्थान भाऊला आज (१ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता न्यायालयात हजर करणार आहेत. हिंदुस्थान भाऊविरोधात धारावी पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदुस्तानी भाऊला पोलिसांनी कलम ३५३, ३३२, ४२७, १०९, ११४, १४३, १४५, १४६, १४९, १८८, २६९, २७० भा द वि सह कलम ५१(ब) आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 सह कलम 37 (३),१३५ जमाव बंदी आदेश भंग सह कलम 3 महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 या कलमा अंतर्गत अटक करण्यात आली.
हिंदुस्थानी भाऊ अर्थात विकास पाठक याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यात त्याने दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या नाही तर राज्यात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यानंतर मोठ्या संख्येने दहावी आणि बारावीचे विद्यार्थी काल (३१ जानेवारी) राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावी या निवासस्थान बाहेर मोठ्या संख्येने जमा झाले होते. आणि विद्यार्थींनी शिक्षणमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी विद्यार्थींवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर सौम्य लाठीचार्ज केला.
दरम्यान रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थांची जबाबदारी मी का घेऊ असा सवाल हिंदुस्थानी भाऊने केला होता. विद्यार्थी आंदोलन करतायत ही जबाबदारी राज्य सरकारची आहे असंही हिंदुस्थानी भाऊने एका मराठी वृत्त वाहिनी् सोबत बोलताना काल सांगितलं होतं. गेल्या तीन महिन्यांपासून दहावी-बारावीचे विद्यार्थी डिप्रेशनमध्ये होते, अनेकांनी जीव देण्याची इच्छा व्यक्त केली, त्यामुळेच रस्त्यावर उतरून आंदोलन करावं असं आपण आवाहन केल्याचं त्याने म्हटलं होतं.
आंदोलनानंतर काय म्हणाला होता विकास फाटक
हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटक एबीपी माझाशी बोलताना म्हणाला होता की, “मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. ज्या वेळी समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी गरज लागते त्यावेळी मी उभा राहतोय. गेल्या तीन महिन्यांपासून दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. त्याचा सरकारने विचार केला नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी डिप्रेशनमध्ये गेले, काही विद्यार्थ्यांनी जीव देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी आपण एका व्हिडीओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आंदोलन करावं असं आवाहन केलं.”
आधीच्या व्हायरल व्हिडीओत काय म्हणालेला विकास फाटक
विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामागे सोशल मीडिया सेलिब्रिटी हिंदुस्थानी भाऊचा व्हिडीओ असल्याचे बोललं जात आहे. चार दिवसांपूर्वी हिंदुस्थानी भाऊचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. परीक्षा ऑफलाईन न घेता ऑनलाईन घ्याव्यात. शक्य झाले तर रद्द करा पण विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू नका. जर निर्णय बदलला नाही तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असे व्हिडीओत हिंदुस्थान भाऊने म्हटले होतं.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!