मोठी बातमी ! राज्य सरकारकडून निर्बंध शिथिल, लग्नसोहळे व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी 200 लोकाची परवानगी ; पाहा नवीन नियमावली
मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने महाराष्ट्रात लागू करण्यात आलेले निर्बंध शिथील करण्यात आले आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारने कोरोनाची नवीन नियमावली जाहीर केली आहे. अपेक्षेनुसार, निर्बंधामध्ये सूट देण्यात आली आहे. पण सूट देण्यात आलेल्या ठिकाणी जायचे असेल तर लसीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. यात लग्नसोहळे व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 200 लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही नवीन नियमावली एक फेब्रुवारीपासून लागू होणार आहे.
ओमायक्रॉनची लाट नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध पुन्हा एकदा शिथिल करण्याचा निर्णय सोमवारी राज्य सरकारने घेतला. त्यानुसार मंगळवारपासून सर्व पर्यटनस्थळे, राष्ट्रीय उद्याने, सफारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लग्नसोहळे व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 200 लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अंत्यसंस्काराठी 20 व्यक्तींची मर्यदा हटविण्यात आली असून आता कितीही लोकांना उपस्थित राहता येईल. अम्युझमेंट पार्क, थिमपार्क, जलतरण तलाव, वॉटर पार्क 50 टक्के क्षमतेने, उपहारगृह, नाट्यगृह, चित्रपटगृह स्थानिक प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या वेळेत 50 टक्के क्षमतेने. मनोरंजनात्मक कार्यक्रम 50 टक्के क्षमतेने, खुल्या मैदानात किंवा सभागृहात क्षमतेच्या 25 टक्के किंवा 200 लोकांना प्रवेश देण्यात आला आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!