सोशल मीडियावरील कोयता भाईला पिंपरी चिंचवड पोलिसांकडून बेड्या

पिंपरी चिंचवड : सोशल मीडियावर कोयता हातात घेऊन दहशत माजविणाऱ्या आरोपींला दिघी पोलिसांनी अटक केली आहे. रवी देविदास जाधव (वय 19 वर्षे राहणार सावंत नगर, कॉलनी नंबर 5 दिघे पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.41.00
PicsArt_21-12-24_13-44-33-203
Picsart_22-03-30_13-11-35-784
previous arrow
next arrow

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,इंस्टाग्राम वर हातात कोयते घेऊन फोटो ठेवनारा आरोपी रवी जाधव हा दिघी परिसरात असल्याचीमाहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळाली होती. त्यांनी सदरची माहिती तपास पथकातील सपोनि खटाळ, पोउनि भदाणे, पो हा कांबळे, पो हा गायकवाड पोना जाधव यांना दिली. पथकाने आरोपीचा दिघी दत्तनगर परिसरात शोध घेतला असता आरोपी रवी देविदास जाधव  यास सापळा लावून शिताफिने ताब्यात घेऊन त्याची झाडती घेतली असता त्याच्या ताब्यात कोयता मिळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर दिघी पोलीस ठाणे येथे भादंवि कलम 188 सह भारतीय हत्यार कायदा कलम 04 सह 25 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास दिघी पोलीस ठाणे करत आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.