बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकाला अटक; तीन पिस्टल, कोयता जप्त….

पिंपरी चिंचवड : चाकण पोलिसांनी बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकाला अटक केली आहे. त्यांच्याकडुन एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याप्रकरणी मंगळवारी (दि. 1) चाकण, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.किशोर दत्तात्रय पाटे (वय 23, रा. चाकण) याला चाकण पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपी किशोर मंगळवारी दुपारी सव्वाबारा वाजता चाकण येथील रोहकल रोडवर पिस्टल विक्रीसाठी आला होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी किशोर याला सापळा लावून ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे असा 25 हजार 400 रुपयांचा शस्त्रसाठा आढळून आला. पोलिसांनी किशोरला अटक केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.