माजी उपमहापौर केशव घोळवे यांना अटक

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेकडून गाळे मिळवून देतो असे सांगून भाजपा कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश या संस्थेमध्ये दरवर्षी बाराशे करायला भाग पाडून व्यापाऱ्यांची फसवणूक केल्याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात भाजपचे माजी उपमहापौर, विद्यमान नगरसेवक, कामगार नेता केशव घोळवे यांना अटक करण्यात आली आहे.नेपाळी मार्केट, डेक्कन होंडा शोरूमच्या समोर पिंपरी येथे २०१९ ते १ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला.

केशव घोळवे, गुड्डू उर्फ प्रमोद यादव, घनश्याम यादव, मलका यादव, हसरत अली शेख, अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. मोहम्मद अली शेख (वय ४५, रा. शास्त्रीनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व इतर व्यापाऱ्यांची नेपाळी मार्केट येथील जागा मेट्रो प्रकल्पाला जात असल्याने त्यांना महापालिकेकडून पर्यायी जागा एकूण १०० गाळे देण्यात येणार आहेत. ही जागा फिर्यादी व इतर व्यापाऱ्यांना महापालिकेकडून मिळवून देतो, असे आश्वासन आरोपींनी दिले. तसेच भाजप कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश या संस्थेमध्ये दरवर्षी बाराशे रुपयांची पावती करायला भाग पाडून फिर्यादी व इतर व्यापार यांची फसवणूक केली.

शासनाकडून गाळे मिळवून देण्याच्या बहाण्याने फिर्यादीकडून 55 हजार रुपयांची खंडणी घेतली. त्यानंतर देखील एक लाख रुपयांची मागणी केली. त्यासाठी फिर्यादी यांनी विरोध केला असता त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलिस करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.