माजी खासदार गजानन बाबर यांचे निधन

पिंपरी चिंचवड :माजी खासदार गजानन बाबर  यांचे निधन झाले आहे. ते ७९ वर्षाचे होते.त्यांच्यावर बाणेर येथील एका खासगी रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.त्यांना मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या पश्चात पत्नी राजश्री बाबर , दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. माजी नगरसेवक मधुकर बाबर, प्रकाश बाबर हे त्यांचे धाकटे भाऊ होत. शिवसेनेचे माजी शहरप्रमुख योगेश बाबर
यांचे ते चुलते होते.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

दोन दिवसांपूर्वी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना प्रथम निरामय हॉस्पीटलमध्ये दाखव केले होते त्यानंतर त्यांना काल ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर येथे उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांच्यावर आय सी यु मध्ये उपचार सुरू होते.मात्र आज उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला

मुळचे सातारा जिल्ह्यातील असलेल्या गजानन बाबर यांनी १९९० साली वाई मतदारसंघातून विधानसभा लढविली होती. त्यावेळी त्यांना मदनराव पिसाळ यांच्या विरोधात २० हजार ५१७ मते मिळाली होती. त्यानंतर नव्वदच्या दशकात त्यांनी पिंपरी – चिंचवडच्या राजकारणात स्थान निर्माण केले होते. एक कडवट शिवसैनिक म्हणून त्यांनी ओळख मिळवली होती. पिंपरी चिंचवडमधील काळभोरनगर येथे शिवसेनेची पहिली शाखा देखील त्यांनीच सुरु केली होती, यानंतर पिंपरीमधील पारंपरिक प्रस्थ काळभोर यांना हादरा देत बाबर यांनी पहिल्यांदा भगवा फडकवला.

छोटे व्यावसायिक, दुकानदार, व्यापारी आदींच्या ४० संघटनांवर बाबर यांचे वर्चस्व होते. याच ताकदीवर ते ३ वेळा नगरसेवक, हवेली मतदार संघातून २ वेळा आमदार झाले. मात्र २००४ मध्ये त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलास लांडे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. पण त्यातूनही हार न मानत २००९ ते २०१४ या दरम्यान ते मावळ मतदारसंघातून शिवसेनेकडून लोकसभेवर निवडून गेले. “किराणा दुकानात काम करणाऱ्या पोराला बाळासाहेबांनी आमदार-खासदार केले”, असे बाबर यांच्याबद्दल बोलले जायचे.

मात्र २०१४ साली शिवसेनेने त्यांचे तिकीट कापून श्रीरंग बारणे यांना दिले. त्यामुळे तेव्हा पासूनच ते पक्षावर नाराज होते आणि त्यांनी मनसेत प्रवेश केला होता. मात्र तिथे फार काळ ते रमले नाहीत. महापालिका निवडणूक तोंडावर आल्यानंतरही शिवसेनेकडून विशेष जबाबदारी दिली जात नसल्यामुळे ते पक्षावर नाराज हाेते. त्यानंतर २०१७ साली त्यांनी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपला जवळ केले होते.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.