चैनी करता दुचाकी चोरणार्या चोरटयास अटक
पिंपरी चिंचवड : चैनी करता मोटार सायकल चोरणार्या चोरटयास महाळुगे पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडुन ४ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. कानिफनाफ विश्वनाथ घनवटे ( वय ३२ वर्षे, रा- शिवसाईनगर, गल्ली नं.१, दिघी, ता-हवेली जि-पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
औद्योगिक वसाहती मधील मालमत्ता चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वारंवार गुन्हे घडणारे ठिकाणचे गुन्हे प्रवण क्षेत्र म्हणुन क्राईम मॅपिंग तयार करण्याची सुचना दिल्याने वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी महाळुगे पोलीस चौकीचे गुन्हे शोध पथकाचे स.पो.निरीक्षक दत्तात्रय गुळीग व स्टाफला हद्दीतील वारंवार मोटार सायकल चोरीचे गुन्हे घडणारे ठिकाणांनाची माहिती घेवुन, कोणत्या दिवशी व वारी, वेळी चोरी होतात याचा अभ्यास करुन त्या ठिकांनावर पाळत ठेवुन कारवाई करण्याची सुचना दिली.
३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास गुन्हे शोध पथकाचे सपोनि गुळीग, पोली अंमलदार-विठ्ठल वडेकर, शिवाजी लोखंडे, संतोष वायकर आणि महाळुगे वाहतुक विभागाचे पोलीस अंमलदार भवारी हे एच.पी.चौक महाळुगे येथे नाकाबंदी करुन वाहने चेक करीत असताना एका काळया रंगाच्या स्पेल्डर मोटार सायकल स्वाराचा संशय आल्याने त्यास स्वतः थांबवुन चौकशी करता त्याच्या जवळील कागदपत्रांची चौकशी करता त्याने पोलिसाना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने अधिक चौकशी करता त्याने सदरची मोटार सायकल वराळे गावचे हद्दीतुन चोरल्याचे सांगितले. त्या मोटार सायकल चोरी बाबत महाळुगे पोलीस चौकी येथे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेवुन अटक केली. पोलीस कस्टडी रिमांड मध्ये आरोपीने मोटार सायकल चोरीचे ३ गुन्हे केल्याची कबुली दिली असुन त्याचेकडुन एकुण ०४ मोटार सायकल जप्त केल्या आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक महाळुगे अरविंद पवार यांनी, कंपनी व्यवस्थापन व कामगार यांना त्यांचे मोटार सायकली कंपनीच्या आवारात योग्य सिक्युरिटी / सीसीटीव्ही निगराणी खाली मेटल टायर लॉक व हॅन्डल लॉक करुन पार्क करणे बाबत आवाहन केले आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप-आयुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रेरणा कट्टे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक
अरविंद पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दशरथ वाघमोडे यांचे सुचना व मार्गदर्शनानुसार सहा.पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पोउपनि किरण शिंदे, पोलीस अंमलदार राजू कोणकेरी, अमोल बोराटे, विठ्ठल संतोष काळे, युवराज बिराजदार, किशोर सांगळे, अशोक गभाले, शिवाजी लोखंडे, संतोष वायकर, बाळकृष्ण पाटोळे यांचेसह महाळुगे वाहतुक विभागाचे पोलीस अंमलदार भवारी यांनी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अंमलदार गभाले, हे करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!