नॉयलॉन मांजामध्ये अडकलेल्या पशुपक्षांसाठी अक्षय ठरत आहे जीवनदान
कदमवाकवस्ती : गेल्या काही वर्षांपासून पतंगाला नायलॉन किंवा चिनी मांजा वापरला जात आहे. पतंग कट केल्यानंतर झाडांवर केबल आणि सार्वजनिक ठिकाणी असलेल्या मांज्यात पक्षी,प्राणी अडकले जातात.तसेच नायलॉन मांजा गळ्याला अडकून गंभीर जखमी होऊन काही जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.शासनाने चायनीज मांजा वापरण्यावर बंदी घातली असली तरीही बाजारपेठेत तो सहज उपलब्ध होतो.आपला पतंग कापला जाऊ नये म्हणून या मांजाचा वापर होतो अनेकदा पतंग कापला गेल्यावर तो मांजा झाडावर,उंच विद्युत टॉवरवर अडकून पडतो याकडे आपण दुर्लक्ष करतो परंतु यामध्ये उंच आकाशात विहार करणारे पक्षी अडकून पडतात. त्यांना त्यातून सुटका करून घेता येत नाही केवळ आपल्या मदतीशिवाय ते शक्य होत नाही परिणामी अनेक पशुपक्षी आपला जीव गमावतात या पक्षांना जीवदान देण्यासाठी द अल्पीनिस्ट संस्थेतील अक्षय शेलार हे गेल्या सात वर्षापासून साप,घारी,घुबड तसेच अन्य वन्यजीवांना वाचवण्याचे प्रयत्न करत आहेत रोज नवीन काहीतरी बघायला आणि शिकायला मिळते म्हणून ते हे काम करतात.आपल्या परिसरात काहीजण पतंग उडवतात पण पतंग उडवताना हे लक्षात येत नाही की त्याची शिक्षा सुद्धा कोणाला तरी मिळू शकते.पतंग उडवताना हे आपल्या लक्षात येत नाही पतंग ज्यावेळेस कट होते आणि त्याच्यासोबत जो धागा असतो तो कुठेतरी झाडावर,इमारतीवर अडकतो त्यामुळे घार,कावळा,कबूतर आणि विविध प्रकारचे पक्षी मांजामध्ये अडकून पडतात.अश्याच वेगवेगळ्या ठिकाणी झाडांना मांजामध्ये अडकलेल्या चार पक्षांना अक्षयने एकाच दिवशी जीवनदान दिले.
या कार्याचे अनुभव सांगताना अक्षय म्हणाला की,काही ठिकाणी खूप उंचावर पक्षी मांजामध्ये अडकला असेल तर कधी कधी अग्निशामक दलाची मदत घ्यावी लागते यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक मदत सुद्धा करत असतात.अश्याप्रकारे पक्ष्यांचा रेस्क्यू करण्याची परिस्थिती आढळल्यास त्वरित 9764881313 या क्रमांकावर संपर्क करा अशी माहिती यावेळी बोलताना अक्षयने दिली.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!