चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीच्या अंगावर डिझेल ओतून पेटवले ; पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ

पिंपरी चिंचवड : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीच्या अंगावर डिझेल ओतून पेटवून दिले. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना नेहरूनगर पिंपरी येथे शनिवारी (दि. 5) दुपारी पावणे चार वाजता घडली. याप्रकरणी पोलिसानी आरोपी पतीला अटक केली आहे.

बाबू उर्फ राहुल विठ्ठल पारधे (वय 28, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी 28 वर्षीय जखमी पत्नीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाबू याने त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला. तसेच आज स्वयंपाक बनवण्यासाठी उशीर का झाला म्हणून फिर्यादी पत्नीच्या अंगावर डिझेल ओतून पेटवून दिले. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक अक्षय कोकाटे तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.