अनैतिक संबंधास नकार दिल्याच्या रागातून विवाहितेचा गळा आवळून खून; लोहगाव हादरले
पुणे : अनैतिक संबंधास नकार दिल्याच्या रागातून विवाहितेचा गळा आवळून खून केल्याची घटना रविवारी रात्री लोहगाव मध्ये उघडकीस आली आहे. या गंभीर गुन्हयानंतर आरोपी महिलेचा मृतदेह बाथरूम मध्ये टाकून घराला कुलूप लावून फरार झाला होता. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गुलाम मोहम्मद शेख (वय 30, रा. पठारे वस्ती संत नगर लोहगाव, मूळचा रा. बिहार) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी रघुनाथ सुर्यवंशी (वय- ४२ वर्षे,लोहगाव पुणे) यानी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव येथील मोझेआळी परिसरातील आरोपी गुलाम हा महिलेच्या घरात भाड्याने राहण्यास होता. दरम्यानच्या काळात त्यांचे प्रेम संबंध निर्माण झाले होते. ही बाब महिलेच्या कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांनी आरोपीला घर रिकामी करण्यास सांगितले. रविवारी दुपारी सदरची महिला घरात एकटीच असताना गुलाम याने घरात येऊन तिचा बाथरूम मध्ये गळा आवळून खून केला.
खुनाच्या गुन्ह्यात नंतर घराला कुलूप लावून तो निघून गेला. सदर महिलेचा पती व मुले कामावरून घरी आल्यानंतर घराला कुलूप असल्याचे पाहिले. तिला संपर्क केला असता त्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे रात्री उशिरा घराचा दरवाजा तोडल्यानंतर सदर महिलेचा मृतदेह बाथरूम मध्ये आढळून आला. घटनेची माहिती मिळताच तात्काळ विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत महिलेच्या कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गुलाम शेख याच्याविरुद्ध अनैतिक संबंधांना नकार दिल्यामुळे गळा आवळून खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी विमानतळ पोलिसांचे विशेष पथक रवाना करण्यात आलेले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!