येरवडा कारागृहात कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : पोक्सो कायद्या अंतर्गत येरवडा तुरुंगात असलेल्या सोमवारी पहाटे एका कैद्याने तुरुंगातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. टॉवेलच्या साह्याने कारागृहाच्या खोलीतील दरवाजाच्या गजाला गळफास घेऊन आत्महत्या केली. समाधान कांतीलाल सावंत (वय 26) असे आत्महत्या करणाऱ्या कैद्याचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर पोलीस स्टेशन कडील पॉक्सो गुन्ह्यातील न्यायाधीन बंदी समाधान सावंत याला 24 जानेवारी रोजी न्यायालयाच्या आदेशाने तात्पुरत्या कारागृहात पाठविण्यात आले होते. त्यानंतर न्यायाधीन बंदी म्हणून 30 जानेवारी रोजी टिळक सेपरेट यार्ड येथील खोली क्रमांक 37 मध्ये इतर तीन आरोपींसह ठेवण्यात आले होते. सोमवारी पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास समाधान याने टॉवेलच्या साहाय्याने कारागृहाच्या खोलीतील दरवाजाचे गजाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. यावेळी कारागृह विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासणी पूर्वीच मृत असल्याचे घोषित केले. कारागृह विभागाच्या नियमानुसार ससून रुग्णालय येथे शवविच्छेदन करून मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

घटनास्थळी पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, कारागृह विभागाच्या अधीक्षक राणी भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान गुरव करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.