मोक्का गुन्ह्यात फरार असलेल्या निलेश घायवळ टोळीतील एकाला अटक, गुन्हे शाखा युनिट ३ची कामगिरी
पुणे : संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) व खुनाचा प्रयत्न तसेच खंडणीसाठी मारहाण केल्याप्रकरणात फरार असलेल्या निलेश घायवळ टोळीतील एकाला गुन्हे शाखेच्या युनिट 3 च्या पथकाने पुणे जिल्ह्यातील मोरगाव येथून अटक केली. गणेश सतीश राऊत (वय-31 रा. ज्ञानेश्वर कॉलनी, डीपीरोड, कोथरुड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
गणेश राऊत याच्यावर पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारहाण, धमकावणे व हत्यार बाळगल्याप्रकरणी मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरातील गुन्हेगारांवर प्रतिबंध करण्यासाठी फरार आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. मंगळवारी (दि.8) वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन , उपनिरीक्षक दत्तात्रय काळे व पोलीस अमंलदार फरार आरोपींचा शोध घेत होते.
पेट्रोलींग दरम्यान पथकाला कोथरुडच्या मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी गणेश राऊत हा मोरगाव येथील एसटी स्टँड येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने एसटी स्टँडजवळ सापळा रचून आरोपी गणेश राऊत याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीला पुढील तपासासाठी कोथरुड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे,
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे , सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय काळे,
पोलीस अंमलदार महेश निंबाळकर, संतोष क्षिरसागर, राजेंद्र मारणे, रामदास गोणते, कल्पेश बनसोडे, राकेश टेकावडे, दिपक क्षिरसागर, सतीश कत्राळे, प्रताप पडवाल, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे, सुजीत पवार (चालक) यांच्या पथकाने केली.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!