पिंपरीत नागरिकांना आयुष्यमान भारत योजना कार्ड आणि ई श्रम कार्डचे वाटप

पिंपरी चिंचवड : भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक संदिप वाघेरे, तसेच भाजप कार्यकर्ते जयेश चौधरी, गणेश वाळुंजकर, अनिता वाळुंजकर यांच्या माध्यमातून पिंपरीत नागरिकांना आयुष्य मान भारत योजना कार्ड आणि ई श्रम कार्ड चे वाटप करण्यात आले.यावेळी शहराच्या महापौर माई ढोरे नगरसेवक संदिप वाघेरे, शैलेश मोरे, माजी नगरसेविका ज्योतिका मलकानी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयेश चौधरी यांनी केले.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

यावेळी बोलताना महापौर माई ढोरे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना साठी अनेक योजना आणल्या त्या मधील अत्यंत उपयोगी ह्या दोन्ही योजना आहेत आणि त्या साठी नागरिक सुध्दा चांगला प्रतिसाद देत आहेत. नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले मी गेल्या पाच वर्षांत आपल्या भागातील नागरिकांनसाठी अनेक योजना राबविल्या भागात तील बगिचे,रस्ते,पाणीपुरवठा,यामधे जास्तीतजास्त सुधारणा करकणयाचा प्रयत्न केला नागरिकांनी देखील सहकार्य केले. गणेश वाळुंजकर यांनी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक कार्यकरते कायम समाजासाठी काम करत असतात .

कोरोना काळात अनेक माध्यमातुन लोकांना मदत केली या वेळी नेहुल कुदळे, विशाल वाळुंजकर, आरती निर्मल,मुखिसिंग वलेचा, किशोर गोयल, कमल मलकानी किशोर उदास, ओमप्रकाश शर्मा या जुन्या जेठय कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला आणि करोना काळात अनेक नागरिकांना प्लाझामा मिळवून देण्याचे विषेष मदत करणारे संजय गायखे यांचा विषेष सत्कार करण्यात आला. साधरण ३५०० कुटुंबास कार्ड वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदू भोगले यांनी केले. तर आभार नेहुल कुदळे यांनी मानले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.