CA परीक्षेत अपयश आल्याने पिंपरीतील २४ वर्षीय तरुणीची आत्महत्या
पिंपरी चिंचवड : सीएची (सनदी लेखपाल) दोन वेळा परीक्षा देऊनही यश न आल्याने नैराश्यातून एका तरुणीने राहत्या घरात केबलच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी केशवनगर, चिंचवड येथे घडली आहे. पल्लवी संजय जाधव (वय २४, रा. केशवनगर, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पल्लवी सीए अभ्यासक्रमाचा अभ्यास करीत होती. यापूर्वी दोन वेळा सीएची परीक्षा दिली. मात्र, दोन्ही वेळेला तिला अपयश आले. मागील वेळी तिने तिसऱ्यांदा सीएची परीक्षा दिली. त्याचा निकाल नुकताच लागला आहे. मात्र, या वेळीही अपयश आल्याने नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!