घरफोडी करणाऱ्या तीन सराईत सख्या भावांना अटक, लोणीकाळभोर पोलिसांची कामगिरी

पुणे :  घरात कोणी नाही याचा फायदा घेऊन घरफोडी करणाऱ्या तीन सराईत सख्या भावांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून घरफोडीच्या गुन्ह्यातील दीड लाखांचे 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. पोलिसांनी ही कारवाई वडकी परिसरात सापळा रचून केली.

शाहरुख विजय पवार (वय-27), बाज्या विजय पवार (वय-21), देवगुन विजय पवार (वय-19 सर्व रा. माप्तेमळा, ता. आटपाडी, जि. सांगली ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत यल्लाप्पा कलाप्पा सन्नके (रा. होळकरवाडी मुळ रा. सोलापूर ) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी हे गावी गेल्यानंतर त्यांच्या घराचे कुलुप तोडून घरातील 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले होते. या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार नितीन गायकवाड  व सुनिल नागलोत  यांना हा गुन्हा सराईत गुन्हेगार शाहरुख पवार व त्याच्या भावांनी केला असल्याची माहिती मिळाली. तसेच ते वकडी परिसरात आले असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी वडकी परिसरात तिघांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीपैकी देवगुन पवार हा लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन घरफोडीच्या गुन्ह्यात फरार होता

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता ,पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील,
सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई,.वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी,.पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजु महानोर  दिगंबर बिडवे, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, सुनिल नागलोत, श्रीनाथ जाधव, संभाजी देविकर, दिगंबर साळुंके यांच्या पथकाने केली

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.