विद्यार्थ्यांच्या स्टायफंडवर डल्ला मारणा-या उच्चशिक्षित चोरट्याला अटक

पिंपरी चिंचवड :विद्यार्थ्यांच्या स्टायफंडवर डल्ला मारणा-या उच्चशिक्षित चोरट्याला अटक केली आहे.विक्रांत स्वामीनाथ भिंगे (वय 34, रा. पाषाण गावठाण, पुणे) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने चिंचवडमधील एका शैक्षणिक संस्थेच्या संगणकाचा पासवर्ड 20 एप्रिल 2021 ते 15 मे 2021 या कालावधीत चोरला. त्याद्वारे अकाऊंटमध्ये बदल करून विद्यार्थ्यांच्या स्टायपंडची रक्‍कम दोन महिलांच्या खात्यावर जमा केली. याप्रकरणी 7 जुलै 2021 रोजी बॅंक खातेदार दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

ज्या बँक खात्यात पैसे जमा झाले त्या खातेधारक महिलांना बोलावून पोलिसांनी त्यांची चौकशी केली. मात्र त्याबाबत महिलांना काहीच माहिती नव्हते. यामुळे पोलिसांना या गुन्ह्याच्या मुळाशी पोहोचण्यास अडचण येऊ लागली. एका महिलेच्या बॅंक खात्याला तिच्या पतीचा म्हणजे आरोपी विक्रांत भिंगे याचा मोबाइल क्रमांक जोडलेला होता. पोलिसांनी या क्रमांकाची माहिती घेतली.

यामध्ये पोलिसांना एक सुगावा लागला. ज्या-ज्या वेळी संबंधित महिलांच्या बॅंक खात्यावरील रक्‍कम एटीएमद्वारे काढण्यात आली त्यावेळी आरोपी भिंगे हा तिथे असल्याचे तांत्रिक तपासात निष्पन्न झाले. संशयावरून पोलिसांनी भिंगे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.