आंबेगाव तालुक्यातील अवैध धंद्यांवर पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

पुणे : आंबेगाव तालुक्यातील अवैध धंद्यांवर पुणे ग्रामीण पोलिसांनी वेगवेगळ्या धडक कारवाई केली आहे. १५ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण, दहशतवाद विरोधी पथक पुणे ग्रामीण तसेच मंचर पोलीस स्टेशनचे वेगवेगळ्या पथकाने कारवाई केल्या.

त्यामध्ये साबिर अजगर हरियाणी (वय ३१ वर्ष- रा मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे)हा नामदेव थोरात त्याच्या सांगण्यावरून मटका घेतो अशी माहिती मिळाल्याने सदर इसमांविरुद्ध कारवाई करून त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम १० हजार ९९० रुपये तसेच मोबाईल व इतर ४ हजार असा एकूण १४ हजार ९९० किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

तसेच नामदेव थोरात याच्या सांगण्या वरून मटका घेणारा अमित भोलेश्वर उबाळे (वय- ३२ रा. घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे) याांच्या ताब्यातून रोख रक्कम ३ हजार व मोबाईल इतर ३ हजार असा एकुण ६ हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.नामदेव थोरात वर यापूर्वीचे मुंबई जुगार कायद्याचे एकूण आठ गुन्हे दाखल आहेत.

तसेच मौजे पेठ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील सानिया किराणा अँड जनरल स्टोअर व राज किराणा अँड जनरल स्टोअर्स येथे छापा टाकून  सत्तार भाई कादर भाई तांबोळी (वय ५० वर्षे रा.पेठ, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे) व सिराज कासम भाई तांबोळी (वय 27 वर्षे रा. पेठ तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे) यांच्या ताब्यातून एकूण ६ हजार ४५० रुपये किमतीचा अवैद्य पान मसाला तंबाखू (गुटखा) जप्त करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि सतिश होडगर, सपोनि नेताजी गंधारे (स्थागुशा), सपोनि अर्जुन मोहिते(ATS), पोसई सोमेश्वर शेटे (मंचर पोस्टे), सहा. फौज. राजेश पवार( Ats ),
सहा. फौज. प्रकाश वाघमारे (स्थागुशा), सहा. फौज. विक्रम तापकीर (स्थागुशा), पोहवा दिपक साबळे (स्थागुशा), पोहवा ईश्वर जाधव (ATS), पोना संदीप वारे (स्थागुशा), पोना विशाल भोरडे (Ats), पोना मोसीन शेख (ATS), पोना आढारी (मंचर पोस्टे),
पोशी अक्षय नवले(स्थागुशा), पोशी प्राण येवले (स्थागुशा),
चा. सहा. फौज. मुकुंद कदम (स्थागुशा) यांनी केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.