पुण्यात शिवसेनेचे उपनेता रघुनाथ कुचिक यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल
पुणे: लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी शारीरीक संबंध करुन तिला गरोदर केले. तसेच जबरदस्तीने गर्भपात करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कामगार नेते आणि शिवनेतेचे उपनेता याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मॉडेल कॉलनीतील प्रबोधन फाऊंडेशन, प्राईड हॉटेल, गोव्यातील बेलीझा बाय दी बीच हॉटेल येथे ६ नोव्हेंबर २०२० ते १० फेब्रुवारी २०२२२ दरम्यान घडला आहे.या घटनेमुळे शहरात खळबळ निर्माण झाली आहे.
रघुनाथ बबनराव कुचिक (रा. येरवडा) असे या शिवसेना उपनेत्याचे नाव आहे. याप्रकरणी एका २४ वर्षाच्या तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रघुनाथ कुचिक हे कामगार क्षेत्रात कार्यरत असून शिवसेनेचे उपनेते आहेत़. आरोपीने फिर्यादीसोबत प्रेमसंबंध निर्माण करुन लग्नाचे आमिष दाखवले. फिर्यादीसोबत वेगवेगळ्या ठिकाणी शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्यातून फिर्यादी तरुणी गरोदर राहिली. हे कळताच रघुनाथ कुचिक यांनी जबरदस्तीनं गर्भपात करुन तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच फियार्दी यांची तब्येत ठीक नसताना फिर्यादीकडून समजूतीचे करारनाम्यावर सह्या करुन घेतली आहे. या प्रकरणी रघुनाथ बबनराव कुचिक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!