इंदापूर शहरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

इंदापूर : पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरामध्ये एका तरुणाने रात्रीच्या वेळी राहत्या घरात दोरीने गळफास घेतल्याची घटना घडली आहे. चेतन गणपत चौगुले ( रा. वडारगल्ली,शासकीय गोडाउनजवळ, इंदापूर) असे आत्महत्या करणार्‍याचे नाव आहे. याबाबत सुहास गणपत चौगुले (वय 29 रा.वडारगल्ली इंदापूर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुहास चौगुले आणि चेतन चौगुले हे भाऊ असून ते सर्वजण एकत्र रहात होते. घरातील सगळे लोक 19 तारखेला जेवण केल्यानंतर रात्री 11.30 च्या सुमारास आपआपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजले तरी चेतन उठला नसल्याने त्याला उठवण्यासाठी भाऊ आणि आई गेले.  दरवाजा वाजवूनही चेतनकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी दरवाजा जोरात ढकलुन उघडला. तर स्लॅबच्या घराच्या लोंखडी हुकास चेतनने पांढर्‍या दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. उपचारासाठी उपजिल्हा रूग्णांलयामध्ये दाखल केले असता डाॅक्टरांनी तो मृत झाल्याचे घोषित केले. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही. पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.