चोरीच्या दुचाकी गाड्या olx वर विकणाऱ्या आरोपीला अटक

पुणे : चोरीच्या दुचाकी गाड्या olx वेबसाईट वर विकणाऱ्या आरोपीला पुणे गुन्हे शाखा युनिट सहाच्या पोलिसांनी अटक केली आहे. दत्ता संजय दुर्गुळे (वय 21 वर्षे सध्या. रा जे जे नगर, गल्ली नंबर 02, वाघोली, तालुका हवेली, जिल्हा पुणे मूळ रा. जेकटे वाडी, तालुका परांडा, जिल्हा उस्मानाबाद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलिस हद्दीमध्ये गस्त करीत असताना त्यांना त्याच्या बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, एका व्यक्तीकडे चोरीच्या दुचाकी गाड्या असून त्याने olx वेबसाईटवर गाडी विक्रीस टाकली असून तो जे जे नगर वाघोली या ठिकाणी गाडी विकण्यासाठी येणार असून केसनंद फाटा रोडवर थांबलेला आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.. त्याचे जवळ असलेल्या मोटार सायकलचे नंबर व कागदत्रांबाबत चौकशी केली असता तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. म्हणून त्यास ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने सदरची मोटार सायकल भावडी रोड वरील ध्रुव अपार्टमेंट येथून चोरलेबाबत सांगितले. तसेच 10 महिन्यांपूर्वी काळे पडळ हडपसर येथून होंडा कंपनीची ड्रीम निओ मोटार सायकल चोरले बाबत देखील सांगितले आहे. सदर आरोपी कडून लोणीकंद पोलीस स्टेशन गु र नं 73/2022 भा दं वि क 379 व हडपसर पोलीस स्टेशन गु र नं 1007/2021 भा दं वि क 379 हे गुन्हे उघड झाले आहेत. नमूद आरोपीने सदरचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

सदरची कामगिरी रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा नारायण शिरगावकर, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे २ गणेश माने, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ६ यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.