ठाकरे सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक; दाऊद इब्राहिम मनी लॉड्रींग केसशी कनेक्शन

मुंबई : ठाकरे सरकारमीधल मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना सक्त वसुली संचालनालयाने  (ED) अटक केली आहे.नवाब मलिक यांची सकाळपासून चौकशी करण्यात आली होती. इक्बाल कासकर यानं नाव घेतल्यानंतर नवाब मलिक यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. त्यानंतर आता ईडीनं (ED) अटकेची कारवाई केली आहे. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर त्यांना मेडीकलसाठी नेण्यात आलं आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहेत. ईडीनं नवाब मलिक यांची आठ तास चौकशी केल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

ईडीचे एक पथक पहाटे 5 वाजता नवाब मलिक यांच्या घरी दाखल झाले होते.. तेव्हा नवाब मलिक यांनी आपणच ईडीच्या कार्यालयात 7 वाजता येतो, असे सांगितले. त्यानुसार सकाळी 7 वाजता नवाब मलिक हे ईडी कार्यालयात पोहचले.  त्यानंतर मलिकांची चौकशी करण्यात आली. ही माहिती समजताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर एकच गर्दी केली. तसेच केंद्र सरकार हे केंद्रीय तपास यंत्रणेचा सूड बुद्धीने वापर करत असल्याचा आरोपही कार्यकर्त्यांनी केला.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

या सर्व गदारोळादरम्यान मलिकांची चौकशी सुरुच होती. मात्र यानंतर अखेर 7-8 तासांनी ईडीने त्यांना अटक केली. विशेष बाब म्हणजे नवाब मलिक हे मंत्रीपदावर असताना अटक झालेले दुसरे मंत्री ठरले आहेत. याआधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही अटक करण्यात आली होती.

लढणार आणि जिंकणार

आपल्याला अटक झाली असली तरी आपण घाबरणार नाही अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली आहे. तसेच या विरोधात आपण लढू आणि जिंकू असा विश्वासही मलिक यांनी व्यक्त केला आहे.

मनी लॉड्रिंगच्या प्रकरणात  नवाब मलिक यांची ईडी अधिकार्‍यांकडून चौकशी सुरु होती. 1993 मधील बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीची जमीन नवाब मलिक यांनी घेतल्याचा आरोप भाजपने काही दिवसांपूर्वी केला होता. त्यावर मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला होता.

दाऊद इब्राहिम हा भारतात अशांतता माजविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे एनआयएला संशय असून त्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वेगवेगळ्या सुरक्षा एजन्सीजकडून तपास केला जात आहे. दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर हा दाऊदचे नाव वापरुन जमीन व्यवहार करत असतो. त्यात मनी लॉड्रिंग झाल्याचा संशय आहे.

इक्बाल कासकर याच्याकडे ईडीने चौकशी केली होती. त्यात कासकर याने मलिक यांचे नाव घेतल्याचे सांगितले. त्यातूनच मलिक यांच्याकडे चौकशी करण्यात आली आहे आणि आता त्यांना अटक करण्यात आली आहे. राज्यात पुन्हा एकदा राजकीय घमासान सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजप  मोदी सरकारवर  मलिक हे आरोप करीत असल्याने त्यांचे तोंड बंद करण्यासाठी ही कारवाई केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात आहे. दरम्यान, ईडीच्या कार्यालयाबाहेर कोठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविला आहे. बॅरिकेट लावून परिसरात लोक जमू नये, अशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.