खुनाच्या प्रयत्नातील फरार तडीपार आरोपीला अटक ; समर्थ पोलिसांची कामगिरी
पुणे : पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले असताना तडीपारीच्या आदेशाचा भंग करुन शहरात वावरणाऱ्या आणि खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल आहे. ही कारवाई मंगळवार पेठेत करण्यात आली.
रोहण्या उर्फ रोहन अशोक गायकवाड (वय-25 रा. कलवडी वस्ती, फलके वस्ती, लोहगाव, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विमाननगर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्तांनी दोन वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. आरोपीने पुणे शहरात येण्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.
समर्थ पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी हद्दीत गस्त घातल असताना पोलीस अंमलदार शाम सुर्यवंशी यांना येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न करणारा आणि तडीपार आरोपी मंगळवार पेठेतील सदानंदनगर येथील रोडवर उभा असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने सहा महिन्यापूर्वी येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा केल्याची कबूली दिली.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 1 डॉ . प्रियंका नारनवरे, सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग सतिश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे,पोलीस निरीक्षक गुन्हे उल्हास कदम यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संतोष काळे, सतिश भालेराव, सुभाष पिंगळे, हेमंत पेरणे, सुभाष मोरे, निलेश साबळे, श्याम सुर्यवंशी, शुभम देसाई, विठ्ठल चोरमले, महेश जाधव यांनी केली
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!