पोलीस असल्याचे सांगून मुलीसोबत एकट्या राहणा-या महिलेवर बलात्कार
पिंपरी चिंचवड : पोलीस असल्याचे सांगून मुलीसोबत एकट्या राहणा-या महिलेला धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. यातून महिला गरोदर राहिली असता तिचा गर्भपात केला. याप्रकरणी पीडित महिलेने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2020 ते 2 जानेवारी 2022 या कालावधीत साखरेवस्ती, भोसरी आणि हिंजवडी फेज एक येथे घडला आहे.
आकाश प्रकाश पांढरे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने 26 फेब्रुवारी 2022 रोजी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला तिच्या मुलीसोबत राहते. ती एकटी असल्याचा आरोपीने गैरफायदा घेतला. आरोपी आकाश याने तो पोलीस असल्याचे सांगून महिलेला धमकी देऊन ‘तू एकटी कशी राहतेस बघतो’ असे म्हणून महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. आकाश याने फिर्यादी महिलेसोबत वारंवार जबरदस्ती व अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले. त्यापासून फिर्यादी महिला गरोदर राहिली. हे माहिती झाल्यानंतर आरोपीने फिर्यादीला गर्भपाताच्या गोळ्या खायला लावून गर्भपात घडवून आणला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक पूजा कदम तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!