वकिलाने महिलेस गुंगीकारक औषध देऊन अश्लील काढले अश्लील फोटो, व्हिडीओ ; ते व्हायरल करण्याची धमकी देत केला वारंवार बलात्कार

पिंपरी चिंचवड : एका महिलेला वकिलाने कामानिमित्त हॉटेलवर भेटायला बोलावले. तिथे महिलेला गुंगीकरक औषध दिले आणि बलात्कार करून महिलेचे विवस्त्र अवस्थेतील फोटो, व्हिडीओ काढले. फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वकिलाने वारंवार बलात्कार केला असल्याची फिर्याद संबंधित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात दिली आहे. हा प्रकार जून, जुलै 2018 ते 3 फेब्रुवारी 2022 या कालावधीत पिंपरी, शिवाजीनगर, वडगावशेरी, खराडी या भागात घडला.

अॅड. अजय अप्पाराव साताळकर आणि दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने 26 फेब्रुवारी 2022 रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजय याने फिर्यादी महिलेसोबत ओळख वाढवून, मैत्री करून प्रेमाची मागणी केली. त्यासाठी फिर्यादीने स्पष्ट नकार दिला. तरीही एसआरए (पुनर्वसन प्रकल्पाचे) मोठे काम मिळाले असल्याचे सांगून पक्षकारांसोबत कामाबाबत बोलणी करून काम समजून घेण्यासाठी फिर्यादीला पिंपरी येथील एका हॉटेलमध्ये बोलावले.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

हॉटेलवर पाण्यातून गुंगीकारक औषध देऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेऊन फिर्यादीचे विवस्त्र फोटो, व्हिडीओ काढले. फिर्यादीसोबत लग्न करणार असल्याचे सांगून हा प्रकार कोणास न सांगण्याची आरोपीने धमकी दिली. आरोपीने फिर्यादीला पुन्हा भेटण्यासाठी संपर्क केला असता फिर्यादीने नकार दिला. त्यामुळे फिर्यादीचे फोट व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने फिर्यादीला विविध ठिकाणी बोलावून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.