ऍमेझॉन कंपनीतून मागवला लॅपटॉप ग्राहकाला मिळाले चक्क दोन किलो मीठ

पिंपरी चिंचवड :  पिंपरी येथील एका डॉक्टर महिलेने ऍमेझॉन कंपनीच्या माध्यमातून 63 हजारांचा लॅपटॉप मागवला. मात्र ऍमेझॉनच्या डिलिव्हरी बॉयने आणलेल्या पार्सलमध्ये चक्क दोन किलो मीठ आले. हा प्रकार 10 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेसात वाजता वल्लभनगर पिंपरी येथे उघडकीस आला.

डॉ. जना प्रणित जोशी (वय 43, रा. वल्लभनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऍमेझॉन कंपनीतील अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी ऍमेझॉन इंडिया या कंपनीच्या माध्यमातून लेनोवो कंपनीचा 63 हजार 990 रुपये किमतीचा लॅपटॉप ऑनलाईन ऑर्डर केला. ती ऑर्डर फिर्यादी यांना 10 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी साडेचार वाजता मिळाली. ऍमेझॉन कंपनीच्या डिलिव्हरी एजंटने लॅपटॉपचे पार्सल फिर्यादी यांना आणून दिले. ते उघडून बघितले असता त्यामध्ये लॅपटॉप ऐवजी दोन किलो मिठाच्या पुड्या आणि खाकी कागद आढळून आले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.