सुजाता गजानन कुदळे “आदर्श शिक्षक” पुरस्काराने सन्मानित.. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान.
लोणी काळभोर : दौड तालुक्याततील जिल्हा परिषद शाळेतील महिला शिक्षक यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार देण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रंजीत शिवतारे ,बांधकाम सभापती प्रमोद काकडे, कृषी विभागाचे सभापती बाबुराव वाईकर, गट नेते शरद लेंडे, शिक्षण समिती सदस्य अरुण थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा शिक्षण अधिकारी संध्या गायकवाड, व पंचायत समिती लहू शेलार, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, गट शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे, व आदर्श शिक्षक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद पुणे यांच्या विद्यमाने जिल्हास्तरीय सन २०१९-२० व २०- २१ गुणवंत शिक्षक पुरस्कार व शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शक शिक्षक पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन अल्पबचत भवन पुणे येथे करण्यात आले होते. पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्ह्यातील दौड तालुक्यातील प्राथमिक शाळेच्या महिला शिक्षक सुजाता कुदळे सहजपूर येथील शिक्षका सुजाता कुदळे यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण देण्यात आला.
सहजपूर जिल्हा परिषद शाळेच्या सुजाता कांबळे यांनी तालुक्यातील १९ वर्षे काम केले व या शाळेत त्या रुजू झाल्यापासून त्या शाळा सर्व शाळा डिजिटल करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. कोरोनाच्या काळात ऑनलाइन शिक्षण देताना मोबाईलला रेंज नसल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होऊ नये म्हणून त्यांनी पालकांच्या मदतीने पूर्णवेळ ऑफलाईन शिक्षण दिले.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!