पेट्रोल पंपावार दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले ६ जण जेरबंद
पुणे : पेट्रोल पंपावार दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर त्यांचे ३ साथीदार पळून गेले आहेत. पोलिसांनी त्यांचेकडून घातक हत्यारासह ३ दुचाकी असा एकूण २ लाख ५० हजार ३१० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कुणाल नारायण जाधव (वय २२, रा. ओमकार कॉलनी, काळेपडळ, हडपसर, पुणे), ऋषीकेश राजेंद्र बर्डे (वय २१, रा घुंगरवाली चाळ, संतोष नगर, कात्रज, पुणे), विकी धनंजय म्हस्के (वय २९) तेजस उर्फ भैया धनंजय म्हस्के (वय २६, दोघे रा. इनामदारवस्ती कोरेगावमुळ ता.हवेली), केतन गौरव कोंढरे (वय १९, रा. सुजाता बंगला, त्रिमुर्ती चौक, भारती विदयापीठ, पुणे), पुर्वेश शशीकांत सपकाळे (वय २२ वर्षे रा.सर्वे नं. २०४, पापडेवस्ती भेकराईनगर, फुरसुंगी) यांना अटक करण्यात आली आहे. तर पृथ्वीराज संजय कांबळे (रा. गणेश दत्तमंदीर, संतोष नगर, कात्रज, पुणे), निखील मारूती शिंदे (पापळ वसाहत, बिबवेवाडी पुणे), अभिषेक बबन गव्हाणे, (सुदाम बिबवेनगर, एसआरएस, गार्डनचे पाठीमागे, गंगाधाम, पुणे) सोनु राठोड, (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) हे तिघे पोलिसांची चाहूल लागून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ मार्च रोजी रात्री २ – ३० वाजण्याच्या सुमारांस तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजु महानोर, पोलीस हवालदार संतोष होले, सुनिल नगालोत, बाजीराव वीर, साळुंके, राजेश दराडे हे घरफोडी प्रतिबंधक कारवाई कामी रात्रगस्त करत असताना दराडे याना बातमीदारामार्फत काही इसम हे लोणी काळभोर, माळीमळा येथील पुणे-सोलापूर महामार्गावरील राजेंद्र पेट्रोलपंप लुटण्याचे तयारीत कदमवाकवस्ती गावचे हददीत तुळजाभवानी हॉटेलचे बाजूस पातक हत्यारासह अंधारात थांबले आहेत, अशी बातमी मिळाली. त्यांनी सदरबाबत वरीष्ठ पोलीस निरीक्षक मोकाशी यांना सविस्तर माहिती कळवली. त्यांनी खात्री करून कारवाई करणेबाबत आदेश दिले.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!