सावत्र मुलाविरोधात पत्नीची तक्रार, पतीकडून पत्नीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

पिंपरी चिंचवड : सावत्र मुलाने विनयभंग केल्याप्रकरणी महिलेने पोलिसांकडे तक्रार केली. त्या रागातून त्या महिलेच्या पतीने तिचा छळ केला. तसेच तिच्यावर जबरदस्तीने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. त्रिवेणीनगर, तळवडे येथे २५ डिसेंबर २०२१ ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत ही घटना घडली.

यशवंत दत्तात्रय जाधव (वय ४५ वर्ष रा. स्वराज्य हौसिंग सोसायटी, त्रिवेणीनगर तळवडे पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी ३२ वर्षीय पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने तिच्या सावत्र मुलाच्या विरोधात पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्याचा राग पीडित फिर्यादी महिलेच्या पतीच्या मनात होता. त्या कारणावरून तसेच घरगुती कारणावरून फिर्यादी महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केला. फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार  केला, असे फिर्यादीत नमूद आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश गुमाणे तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.