दरोड्याच्या तयारीत असलेल्या एका तरुणीसह नऊ जणांना अटक
पुणे : आळंदीत एका हॉटेलसमोर दरोडा घालण्याच्या तयारीत थांबलेल्या नऊ जणांना आळंदी पोलिसांनी अटक केली. या अटक केलेल्या आरोपींमध्ये एका तरुणीचाही समावेश आहे. सदरची कारवाई बुधवारी (दि.२) पहाटे साडेतीन वाजता करण्यात आली.
सागर मोहन साबळे (वय ३४, रा. साबळेवाडी, ता. खेड), कलीम बादशा शेख (वय २१, रा. माजलगाव, जि. बीड), विलास दत्तात्रय वाघमोडे (वय २४, रा. लक्ष्मीनगर, मोशी), तेजस रवींद्र आल्हाट (वय २१, रा. आल्हाटवाडी, मोशी), योगेश संजय हनुमंते (वय २६, रा. डुडुळगाव, ता. हवेली), वैभव बबन कांबळे (वय २१, रा. भीमनगर, मोशी), रोहित रामदास वाजे (वय २७, रा.सस्तेवाडी, मोशी), विशाल केशवराव जाधव (वय २२, रा. लक्ष्मीनगर, मोशी), काजल दीपक देसाई (वय २४, रा. वडगाव रोड, आळंदी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
आळंदी – चाकण रोडवर बुधवारी रात्री गस्त घालत असताना हॉटेल रमेशच्या समोर आडोशाला काहीजण संशयितरित्या थांबले असल्याचे आळंदी पोलिसांना दिसले. पोलिसांनी कारवाई करून नऊ जणांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक नकली पिस्तुल, सहा मोबाईल फोन, नंबर नसलेली दुचाकी, एक कोयता, लाल मिरची पूड, नायलॉन दोरी असा २ लाख १ हजार १५५ रुपयांचा ऐवज आढळून आला. त्यावरून त्यांच्याकडे चौकशी केली असता ते दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलीस शिपाई कैलास गर्जे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!