अल्पवयीन मुलीच्या घरात शिरून तिचा विनयभंग करत ढकलून देऊन केले बेशुद्ध; नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : अल्पवयीन मुलीच्या घरात शिरुन तू मला खूप आवडते, असे म्हणून विनयभंग करुन तिला मारहाण करुन भिंतीवर ढकलून देऊन बेशुद्ध करण्याचा प्रकार पुण्यात समोर आला आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी जनता वसाहतीत राहणार्या एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत जनता वसाहतीत राहणार्या एका १६ वर्षाच्या मुलीने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही मुलगी जनता वसाहतीत राहते. त्यांच्याच वसाहतीत राहणारा मुलगा तिला वारंवार वाटेत अडवतो. तिचा पाठलाग करतो. गुरुवारी दुपारी ही मुलगी निलायम पुलाजवळून जात होती. तेव्हा या तरुणाने तिला अडविले. तो फिर्यादीला तू मला खूप आवडते, माझ्याशी नीट का बोलत नाही, असे म्हणून शिवीगाळ करुन फिर्यादीला हाताने व लाथाबुक्याने मारहाण केली.
त्यानंतर ही मुलगी आपल्या आजीच्या राहते घरात गेली. तिच्या मागोमाग हा तरुण आला. त्याने आजीला ढकलून देऊन घरात शिरला. फिर्यादीशी चाळे करुन तिला जबरदस्तीने जवळ ओढून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल,असे वर्तन केले. तिला पुन्हा हाताने व लाथाबुक्यांने मारहाण करुन भिंतीवर ढकलून दिले़ त्यामुळे ही मुलगी बेशुद्ध पडली. काही वेळाने शुद्धीवर आल्यावर तिने दत्तवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!